सोनपेठच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करू : मेघना बोर्डीकर
परभणी, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। सोनपेठ परिवर्तन विकास आघाडीने जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांची जबाबदारी आता वाढली आहे. नागरिकांनी माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासा
पालकमंत्री मेघना बोर्डीकर; साईनगरमधील 58 लाखांच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण


परभणी, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। सोनपेठ परिवर्तन विकास आघाडीने जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांची जबाबदारी आता वाढली आहे. नागरिकांनी माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून, पालकमंत्री म्हणून माझीही जबाबदारी आहे. सोनपेठ शहरातील विकासाची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.

गुरुवारी (दि. 13) सोनपेठ नगर परिषदेच्या वतीने शहरातील शेळगाव-परभणी रोडवरील साईनगर येथे रस्ता अनुदान योजनेतून 58 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास माजी आमदार व्यंकटराव कदम, नगराध्यक्ष परमेश्वर कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नगरसेवक बळीराम पवार, माजी उपनगराध्यक्ष दत्तराव कदम, मुख्याधिकारी युवराज पौळ, सतीशराव देशमुख, प्रभाकरराव शिरसाट, गटनेते हाजी सद्दाम हुसेन, नगरसेवक अक्षय कदम, जनार्दन झिरपे, साजिद कुरेशी, शुभम कदम, मारुती रंजवे, लक्ष्मीकांत कांदे, विश्वजीत कदम, प्रा. मुंजाभाऊ धोंडगे, संतोष अंभुरे, अ. रहमान सौदागर, दत्ता पांढरे, सुमित पवार, कार्यालयीन अधीक्षक एम. एम. खान, लेखापाल दादासाहेब पोवळ, गणेश राठोड, रवी चव्हाण, विठ्ठल घुगे, खदिर अन्सारी, शकील राज, नितेश लष्करे, शेरू मोजन आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी शहरातील रस्ते विकासाबाबत माहिती दिली. पूर्वी झालेल्या रस्ते कामांच्या तुलनेत नगर परिषदेच्या विद्यमान कार्यकाळात सुरू असलेल्या कामांच्या दर्जात मोठी तफावत आहे. कमी खर्चात दर्जेदार कामे करण्यावर भर देण्यात येत असून, यापुढेही शहरात दर्जेदार विकासकामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोनपेठ शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नगर परिषद आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यात येईल. रस्ते, मूलभूत सुविधा आणि शहराच्या विकासाशी संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande