
पुणे, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या निर्णयात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर केले आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे.या निधीचा प्रमुख उद्देश महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्जपुरवठा करणे हा आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ केवळ राज्य सहकारी बँकेपुरता मर्यादित न राहता राज्यातील व्यापक सहकारी वित्तव्यवस्थेला मिळण्याची अपेक्षा आहे.सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागविणे, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणे आणि वित्तीय क्षमता वाढविण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत होऊ शकते.एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मिळविणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक देशातील पहिली सहकारी बँक ठरल्याने हा निर्णय सहकारी बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
केंद्र आणि राज्यातील सहकारी वित्तसंस्थांमधील समन्वय, परस्पर विश्वास आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. या निधीमुळे राज्यातील सहकारी बँका, विविध सहकारी संस्था आणि त्यांच्या लाखो सभासदांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक व्यापक आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.‘एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मिळविणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्जपुरवठ्यासाठी करण्यात येणार असून, त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल,’ असे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु