द हंड्रेड: रोमांचक विजयानंतरही माजी विजेत्या एमआय लंडनचे आव्हान संपुष्टात
लंडन, 13 ऑगस्ट (हिं.स.)एमआय लंडन संघाची हंड्रेड लीगमध्ये निराशाजनक कामगिरी झाली. महिलांच्या लीगमध्ये ते गुणतालिकेत तळाशी राहिले आणि पुरुषांच्या लीगमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्याने, ते विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. या हंगामापूर्वी रिलायन्सने ए
एमआय लंडनचा संघ


लंडन, 13 ऑगस्ट (हिं.स.)एमआय लंडन संघाची हंड्रेड लीगमध्ये निराशाजनक कामगिरी झाली. महिलांच्या लीगमध्ये ते गुणतालिकेत तळाशी राहिले आणि पुरुषांच्या लीगमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्याने, ते विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. या हंगामापूर्वी रिलायन्सने एमआय लंडन संघ विकत घेतला होता. यापूर्वी, सॅम बिलिंग्सच्या नेतृत्वाखाली या संघाचे नाव ओव्हल इन्व्हिन्सिबल्स होते. एमआय संघात सामील झाल्यानंतर बिलिंग्सला पदावरून हटवण्यात आले. आता तो ट्रेंट रॉकेट्स संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

एमआय लंडनने त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात बर्मिंगहॅम फिनिक्सला पराभूत केले, परंतु प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता विजयाचे अंतर अपुरे होते. तिसऱ्या स्थानासाठी सनरायझर्स लीड्सला मागे टाकण्याकरिता त्यांना हा सामना किमान ५९ धावांनी जिंकणे आवश्यक होते. एमआय लंडनने केवळ दोन धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी सहा गडी गमावून १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, फिनिक्स संघ ७ गडी गमावून केवळ १५५ धावाच करू शकला. एमआय लंडनने हा हंगाम सॅम करनच्या नेतृत्वाखाली खेळला. त्यांनी त्यांच्या आठ सामन्यांपैकी पाच जिंकले आणि तीन गमावले. मँचेस्टर सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचेही निकाल जवळपास सारखेच होते. पण चांगल्या नेट रन रेटमुळे ते पुढे गेले. बिलिंग्सच्या नेतृत्वाखालील रॉकेट्सने त्यांच्या आठ सामन्यांपैकी सहा जिंकले आणि थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. हे त्यांचे सलग दुसरे आणि एकूण तिसरे विजेतेपद आहे. त्यांनी २०२२ मध्ये लुईस ग्रेगरीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते.

महिलांच्या हंड्रेडमध्ये एमआय लंडनची कामगिरी विशेषतः खराब होती. आठ सामन्यांमध्ये केवळ एक विजय मिळवून ते गुणतालिकेत तळाशी राहिले. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या त्यांच्या अंतिम सामन्यात ते फिनिक्सकडून पाच गडी राखून पराभूत झाले. महिलांच्या गटात, एमआय लंडनने, जेव्हा ते ओव्हल इन्व्हिन्सिबल्स म्हणून ओळखले जात होते, तेव्हा दोनदा विजेतेपद पटकावले होते. त्यांनी २०२१ आणि २०२२ मध्ये हे यश मिळवले होते. यामुळे ते एकूण पाच विजेतेपदांसह लीगमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी ठरले आहेत. पण यावेळी, ते दोन्ही गटांमध्ये रिकाम्या हाताने परतले आहेत. लीगच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की हा संघ पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये अंतिम फेरीत पोहोचणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande