
पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता लवळे येथील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, ‘पायाभूत सुविधांचा विकास : विकसित भारताचा मार्ग’ (Infrastructure Development: The Road to Viksit Bharat) या विषयावर ते विशेष व्याख्यान देणार आहेत. सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु