खडकवासला जलशुद्धीकरण प्रकल्पाला सीडब्ल्यूपीआरएसची जागा
पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी १२ गावांमध्ये ग्युलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) प्रकरणांची पार्श्वभूमी असताना या गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. खडकवासला येथे प्
PMC news


पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी १२ गावांमध्ये ग्युलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) प्रकरणांची पार्श्वभूमी असताना या गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. खडकवासला येथे प्रस्तावित२०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) येथील सुमारे २.५ हेक्टर जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रकल्पाचा सुमारे १३ लाख नागरिकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे.सीडब्ल्यूपीआरएस येथे आयोजित ‘स्मॉल रिव्हर रिजनरेशन फ्रेमवर्क कॉन्फरन्स’दरम्यान महापालिका आयुक्तांनी प्रकल्पासाठी खडकवासला येथील २.५ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. त्यांनीयासंदर्भातीलप्रस्तावसीडब्ल्यूपीआरएससमोरमांडला. सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक सेल्वा बालन यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली.

वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेता खडकवासला येथील हा जलशुद्धीकरण प्रकल्प पुण्याच्या भविष्यातील जलनियोजनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. समाविष्ट गावांमध्ये शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी या प्रकल्पामुळे मोठी मदत होणार आहे.महापालिकेच्या सुमारे८९० कोटी रुपयांच्या योजनेसाठी केंद्र सरकारने अर्बन रिलिफ फंडमधून २५ टक्के निधी मंजूरकेला आहे. या योजनेतून खडकवासला, नांदोशी,सणसनगर, किरकटवाडी, नांदेड, धायरी, नऱ्हे, भिलारेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, कोळेवाडी आणि जांभुळवाडी या १२ गावांना लाभ मिळणार आहे.याशिवाय कोंढवे-धावडे, किरकटवाडी, उत्तमनगर आणि शिवणेया चार गावांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासह भविष्यातील वाढत्या पाण्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande