स्कूल  बसचालक आणि वाहतूकदारांना सुरक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थ्यांची वाहतूक हा अत्यंत संवेदनशील विषय असून, शाळा प्रशासन तसेच स्कूल बसचालक आणि वाहतूकदारांनी सुरक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलिस सहआयुक्त संजय दराडे यांनी दिले. पुणे शहर पोलिस आयुक
bus


पुणे, 13 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थ्यांची वाहतूक हा अत्यंत संवेदनशील विषय असून, शाळा प्रशासन तसेच स्कूल बसचालक आणि वाहतूकदारांनी सुरक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलिस सहआयुक्त संजय दराडे यांनी दिले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी स्कूल बस सुरक्षिततेसंदर्भातील विविध बाबींचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा प्रशासन, बसचालक आणि वाहतूकदारांनी सर्व निर्धारित नियमांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.सर्व शाळा आणि स्कूल बस वाहतूकदारांनी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा बाबींचीतीन महिन्यांच्या आत पूर्तताकरावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मुदतीत नियमांची पूर्तता न करणाऱ्या स्कूल बसचा परवानानिलंबित किंवा रद्दकेला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा बैठकीत देण्यात आला.विद्यार्थी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, बसचालक आणि वाहतूकदारांवर पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.स्कूल बस सुरक्षिततेसंदर्भातील आवश्यक माहिती शाळांनी संबंधित ऑनलाइन प्रणालीवर अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तांत्रिक किंवा अन्य अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले.विद्यार्थ्यांची वाहतूक करताना सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि प्रत्येक स्कूल बस सुरक्षिततेच्या निकषांनुसार कार्यरत राहावी, यासाठी पोलिस व आरटीओकडून आगामी काळात तपासणी आणि कारवाईची प्रक्रिया अधिक कडक केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande