सोलापूर - अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस विभाग, प्रांताधिकारी आणि उपविभागीय दक्षता समितीच्या अशासकीय स
sdfg


सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस विभाग, प्रांताधिकारी आणि उपविभागीय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यांनी समन्वयाने काम करून समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६’ या विषयावर जिल्हा नियोजन भवन येथे एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

यावेळी निऱ्हाळी म्हणाले की, सोलापूरसारख्या जिल्ह्यात या कायद्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून पीडितांना लवकर न्याय मिळवून देणे हे सर्वांचे प्राधान्य असावे. पोलीस विभागाने अशासकीय सदस्यांचे म्हणणे ऐकून घेऊन अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास व निपटारा करावा. तसेच विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठका नियमितपणे घेण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande