
सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सात विद्यार्थ्यांची दोन बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. ‘मेपकॉन डिझाईन स्टुडिओ, पुणे’ आणि ‘डायनेक्स इमिशन सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ यांनी घेतलेल्या निवड प्रक्रियेतून या विद्यार्थ्यांची निवड झाली.
संस्थेचे संस्थापक व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी ही माहिती दिली.
‘मेपकॉन डिझाईन स्टुडिओ, पुणे’मध्ये विनोद आप्पासाहेब गाजरे आणि अथर्व आनंद शिंदे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. तर ‘डायनेक्स इमिशन सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये अमित अशोक कोळी, वेदांत विजय पाटील, वसिम इलाही मुलाणी, अभिषेक आगतराव पवार आणि लक्ष्मण नागनाथ पांढे या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली.
‘डायनेक्स इमिशन सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’कडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ३.६ लाख रुपयांचे, तर ‘मेपकॉन डिझाईन स्टुडिओ’कडून प्रतिवर्षी तीन लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
स्वेरी कॉलेजमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आतापर्यंत ४७३ हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी करिअर घडवत असून, प्लेसमेंट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे संस्थेने सांगितले.
विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत एप्टीट्यूड, कम्युनिकेशन स्किल, टेक्निकल स्किल, विविध सॉफ्टवेअर्स तसेच मॉक इंटरव्ह्यूचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत फायदा होत असल्याचे संस्थेने नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड