पिंपरी-चिंचवडमध्ये खड्डे बुजविण्यासाठी प्रभागनिहाय पथके
पुणे, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय स्वतंत्र पथके कार्यान्वित केली असून, खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत खड्ड्यांबाबत २,१६४ तक्रारी प्राप्
PCMC


पुणे, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय स्वतंत्र पथके कार्यान्वित केली असून, खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत खड्ड्यांबाबत २,१६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १,६०९ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. उर्वरित ५५५ खड्ड्यांची दुरुस्ती सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात १२ ते ८० फूट रुंदीचे रस्ते असून, पक्के आणि कच्चे मिळून सुमारे २,०७३ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये डांबरी तसेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून या रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते.जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसासह गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरातील रस्त्यांवर २,१६४ खड्डे पडल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक मार्गांवर वाहने संथगतीने धावत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने प्रभागनिहाय पथकांच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande