
अकोला, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार अकोला महानगरपालिकेव्दारा हर घर तिरंगा 2026 अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 2026 या कालावधीमध्ये अकोला महानगरपालिका व्दारा हर घर तिरंगा 2026 मोहीम राबविण्यात येत आहे. वंदेमातरम गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने यावर्षीच्या अभियानाची संकल्पना वंदे मातरम च्या 150 वर्षांच्या स्मरणाशी जोडण्यात आलेली आहे. तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी फाळणी भयावहता स्मृती दिन देशभरात विविध स्मरण व जनजागृतीपर उपक्रमांव्दारे पाळण्यात येणार आहे.
फाळणीच्या काळात झालेल्या दु:ख, विस्थापन, संघर्ष, त्याग व मानवी वेदनांचे स्मरण करण्याच्या अनुषंगाने आज दि. 14 ऑगसट 2026 सांयकाळी अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा स्थानिक अशोक वाटीका ते हुतात्मा स्मारक पर्यंत कँडल मार्च काढण्यात आली. तसेच या कँडल मार्चचे समारोप हुतात्मा स्मारक येथे हुतात्यांना आदरांजली वाहून करण्यात आले.
या वेळी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, नगरसेवक निलेश देव, पराग गवई, नगरसेविका सौ.रश्मी अवचार, मनपा सहा.आयुक्त गणेश शहाणे, उपायुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे, महानगरपालिका सचिव अनिल बिडवे, जितेंद्र तिवारी, शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, शहर प्रकल्प अधिकारी गणेश बिल्लेवार यांचेसह मनपा अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी हर घर तिरंगा 2026 या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेऊन 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर आणि प्रतिष्ठानांवर तिरंगा ध्वज फडकवून त्यासोबत सेल्फी काढून #harghartiranga 2026 या हॅशटॅगसह सोशल मिडीयावर फोटो शेयर करावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी यावेळी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे