अकोल्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण प्रवेशोत्सव, विश्रामगृह उद्घाटन आणि रानभाजी महोत्सवाचीही मेजवानी अकोला, १४ ऑगस्ट (हिं.स.) | भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आ
अकोल्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

प्रवेशोत्सव, विश्रामगृह उद्घाटन आणि रानभाजी महोत्सवाचीही मेजवानी

अकोला, १४ ऑगस्ट (हिं.स.) | भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय समारंभ होणार असून, राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात येणार आहे.

अकोला येथे केंद्रीय विद्यालयाची स्थापना झाली असून, मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर सकाळी १० वाजता विद्यालयात प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री ऍड. फुंडकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण तसेच आवारभिंतीच्या बांधकामाचा उद्घाटन समारंभ सकाळी ९.४५ वाजता होणार आहे. पालकमंत्री ऍड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

‘आत्मा’तर्फे रानभाजी महोत्सव

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी, शनिवार, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात हा महोत्सव होणार आहे.

या महोत्सवात आरोग्यासाठी पोषक असलेल्या विविध रानभाज्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमांसोबतच नागरिकांसाठी विविध उपक्रमांची मेजवानी असणार आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande