बीबीएनजीच्या फ्युजन फेस्ट प्रदर्शनाचे उद्घाटन
नाशिक, 14 ऑगस्ट (हिं.स.)। - देशातील सर्वशाखीय आणि सर्व भाषीय ब्राह्मण व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था बी बी एन जी तर्फे नाशिकमधील स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ मिळावे या साठी फ्युजन फेस्ट या प्रदर्शनाचे आयोजन लक्षिका मंगल कार्यालय, येथे करण
BBNG's Fusion Fest exhibition


नाशिक, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

- देशातील सर्वशाखीय आणि सर्व भाषीय ब्राह्मण व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था बी बी एन जी तर्फे नाशिकमधील स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ मिळावे या साठी फ्युजन फेस्ट या प्रदर्शनाचे आयोजन लक्षिका मंगल कार्यालय, येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन अशोका बिल्डकॉनचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय लोंढे व नाशिक एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष अँड जयदीप वैशंपायन यांच्या हस्ते संपन्न झाले . या प्रसंगी बी बी एन जी चे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी , सरचिटणीस अरविंद कोरळकर, सहयोगी संचालक डॉ अभिजीत चांदे,महेश देशपांडे हे उपस्थित होते .१४ ते १६ ऑगस्ट दरम्यान आयोजित होणारे प्रदर्शन विनामूल्य असून प्रदर्शना दरम्यान चित्रकला स्पर्धा ,भजन स्पर्धा आणि पाककृती स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले आहे अशी माहिती रसिका कुलकर्णी,डॉ.संदीप चिंचोलीकर व पूनम शुक्ल यांनी दिली .प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी गणेश नाईक , संदीप कुलकर्णी,शैलेश दीक्षित, गौरव खिस्ते ,ओंकार फडके ,अमोल कुलकर्णी, दिप्ती पंडित ,श्रुतिका ओक, अनिकेत जुन्नरे, मृणाल जोशी , सतीश जोशी अर्थव पाठक कार्यरत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande