
रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । ‘हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा’ अभियानांतर्गत शुक्रवारी राजापूर शहरात भव्य तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता एस.टी. डेपो येथून फेरीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमून गेले. ही फेरी जकात नाका, शिवतीर्थ, बाजारपेठ, कोंडेतड पूल, गणेश घाट मार्गे पुन्हा शिवतीर्थ येथे पोहोचली. या फेरीमध्ये नागरिकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
फेरीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ यांसह देशभक्तीपर घोषणांनी परिसर भारावून गेला. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी देशभक्तीची भावना जागृत केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस अभिजित यशवंत गुरव, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, एकनाथ मोंडे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रुती ताम्हनकर, जिल्हा उपाध्यक्ष शीतल पटेल, नगरसेविका सुयोगा जठार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा फेरीमुळे राजापूर शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी