परंपरेला फाटा देत महिला रक्तदात्याच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन
नांदेड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या संजीवनी आरोग्य मंदिर विभागातर्फे आणि गोळवलकर गुरुजी ब्लड बँक, नांदेड यांच्या सहकार्याने संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या २२व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण
अ


नांदेड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या संजीवनी आरोग्य मंदिर विभागातर्फे आणि गोळवलकर गुरुजी ब्लड बँक, नांदेड यांच्या सहकार्याने संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या २२व्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यंदाच्या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीला फाटा देत महिला रक्तदात्याच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

शिबिरात एकूण ९० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये १४ महिला आणि ७६ पुरुष रक्तदात्यांचा समावेश होता. तसेच ६ जोडप्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळण्यास हातभार लागतो. त्यामुळे नागरिकांनी नियमित रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहभागी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि आरोग्य विभागाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande