राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; मुख्यमंत्री फडणवीस
छत्रपती संभाजीनगर, १४ ऑगस्ट (हिं.स.) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत टीका केली. राहुल गांधी यांनी केलेला प्रकार अत्यंत अशोभनीय असल्याचे सांगत, त्यांनी देशाची तसेच संबंधित महिला राष्ट्
अ


छत्रपती संभाजीनगर, १४ ऑगस्ट (हिं.स.) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत टीका केली. राहुल गांधी यांनी केलेला प्रकार अत्यंत अशोभनीय असल्याचे सांगत, त्यांनी देशाची तसेच संबंधित महिला राष्ट्रप्रमुखाची माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेला प्रकार हा राजकीय शिष्टाचाराला धरून नाही. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करण्याबरोबरच इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचाही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अशा पद्धतीचे वर्तन गल्लीतील नेतेही करत नसल्याची टीका त्यांनी केली.

या कृत्याबद्दल राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

‘लोकन्यायालयाने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले’

शिवसेना पक्षनाव आणि पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात निर्णय देईलच; मात्र त्याआधीच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे स्पष्ट केल्याचे त्यांनी म्हटले.

“२०२४च्या विधानसभा निवडणुकीत ‘लोकन्यायालयाने’ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयही याच भूमिकेला अनुसरून निर्णय देईल,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

विविध मुद्द्यांवर फडणवीसांचे भाष्य

माध्यमांशी झालेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षनावाच्या वादासह राहुल गांधी यांच्यावरील टीका, चाकण एमआयडीसीचा प्रश्न आणि जातनिहाय जनगणना यांसारख्या विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा अंतिम निर्णय अद्याप बाकी असून, या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande