उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड क्रीडा संकुलाला अचानक भेट
खेळाडूंच्या अडचणी जाणून घेतल्या विकासकामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना बीड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शुक्रवारी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन तेथील विविध विका
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार


खेळाडूंच्या अडचणी जाणून घेतल्या

विकासकामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना

बीड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शुक्रवारी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन तेथील विविध विकासकामांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी आस्थेने संवाद साधला. त्यांच्या अडचणी, गरजा तसेच अपेक्षा जाणून घेत क्रीडा सुविधांबाबत माहिती घेतली.

नवोदित खेळाडूंना सुविधा देण्याचे निर्देश

नवोदित खेळाडूंना उत्तम सुविधा, सरावासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच क्रीडा संकुलात सुरू असलेली विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचा निर्धार

बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडावेत, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande