कोल्हापूर - खेळाडू व मार्गदर्शकांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर
कोल्हापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा प्रशासनाच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांत सन 2021-22 व सन 2022-23 या वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड झालेल्या खे
कोल्हापूर - खेळाडू व मार्गदर्शकांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर


कोल्हापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा प्रशासनाच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांत सन 2021-22 व सन 2022-23 या वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडू तसेच मार्गदर्शकांना मुख्य अतिथीच्या हस्ते, जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021-22 - गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- श्री. सागर श्रीकांत जाधव- हॉकी, गुणवंत खेळाडू (पुरुष)- श्री. प्रथमकुमार रविंद्र शिंदे- तलवारबाजी,

गुणवंत खेळाडू (महिला)- श्रीम. शुभांगी शिवाजी पाटील व श्रीमती जान्हवी ज. सावर्डेकर (थेट पुरस्कार) - पॉवरलिफ्टिंग,

गुणवंत खेळाडू (दिव्यांग)- श्रीमती अन्नपूर्णा सुनिल कांबळे- पॅरा जलतरण

सन 2022-23 - गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- श्री. संदिप रघुनाथ पाटील- हँडबॉल/फुटबॉल,

गुणवंत खेळाडू (पुरुष)- श्री. पृथ्वीराज बाजीराव पाटील- रग्बी,

गुणवंत खेळाडू (महिला)- श्रीम. श्लोका श्रीपती शिंदे- तलवारबाजी,

गुणवंत खेळाडू (दिव्यांग)- श्री. दिपक मोहन पाटील- पॅरा जलतरण याप्रमाणे जाहीर झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande