
नांदेड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी संयुक्त शिबिरे घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सर्व पात्र शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी एकत्रितपणे शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिरांच्या माध्यमातून पात्र कुटुंबीयांना विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. तसेच प्रत्येक विभागाने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis