
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अँटी रगींग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
ज्ञान स्त्रोत केंद्रासमोरील मैदानात हा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांची उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली.
यावेळी ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ.सुभाष चव्हाण, डॉ.हिंमतराव जाधव, चीफ रेक्टर डॉ.सुनील नरवडे, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे, डॉ.संजय शिंदे, डॉ.विनय लोमटे, डॉ.सचिन भूसारी, डॉ.अश्विनी मोरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गौतम सोनवणे, हरिश्चंद्र साठे, गजानन पालकर यांनी प्रयत्न केले.
ज्ञान स्त्रोत केंद्रात विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही भूलथापाला बळी न पडता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे इतर विद्यार्थ्यांना कोणालाही त्रास होईल असे वर्तन करू नये. विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis