नाशिक जिल्ह्यात एकाच रात्रीत पाच भूकंपाचे धक्के; सुरगाण्यात भीतीचे वातावरण
शुक्रवारी दुपारी पेठ तालुक्यातही जाणविले धक्के नाशिक, 14 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या भागामध्ये एकाच रात्रीतून पाच भूकंपाची धक्के आहे जानविले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने घाबरून
Earthquake Assam


शुक्रवारी दुपारी पेठ तालुक्यातही जाणविले धक्के

नाशिक, 14 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या भागामध्ये एकाच रात्रीतून पाच भूकंपाची धक्के आहे जानविले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ही भूकंपाचे धक्के जाणविल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जानविण्याची घटना अजूनही सुरूच असून जवळपास मागील एक महिन्यापासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत जिल्ह्यातील पेठ सुरगाणा हरसुल दिंडोरी नाशिक तालुक्यातील काही भाग नाशिक शहर या भागामध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट दिसून येत असून नागरिक सातत्याने या प्रश्नावर ती चिंताग्रस्त आहेत.

गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत सातत्याने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या भागामध्ये पाच भूकंपाची टक्के जनविले आहेत नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री दहा वाजून चार मिनिटे, दहा वाजून सात मिनिटे, अकरा वाजून 45 मिनिटं, बारा वाजून सहा मिनिटं आणि शुक्रवारी पहाटे पाच वाजून 32 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणविल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने म्हणजे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन केले आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी पेठ तालुक्यात 4.52 मिनिटांनी गोंदे, बोरवट, देवगाव, भयगाव येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. अशी माहिती पेठेच्या तहसीलदारांनी दिली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande