कर्तव्यात कसूर; परभणीतील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
परभणी, 14 ऑगस्ट (हिं.स.)। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत परभणी जिल्ह्यातील तीन पोलीस अंमलदारांसह एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पिंपळदरी पोलीस ठ
कर्तव्यात कसूर; परभणीतील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई


परभणी, 14 ऑगस्ट (हिं.स.)। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत परभणी जिल्ह्यातील तीन पोलीस अंमलदारांसह एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पिंपळदरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या मुंजाजी पवार, मुंजा पायघन आणि गजानन फुगणर या तीन पोलीस अंमलदारांवर गोवंश वाहतूक प्रकरणातील कारवाईदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तिघांवर निलंबनाची कारवाई केली. याच प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल लाड यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त झालेली माहिती वरिष्ठांना देण्याच्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कर्तक्षव्य बजावताना हलगर्जीपणा अथवा कसूर करणार्या अधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande