राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त टोनगावात मोफत रोगनिदान सप्ताह
भाजपा प्रदेश महामंत्री सुनील राणे यांच्या हस्ते उद्घाटन फुलंब्री मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजीनगर, १४ ऑगस्ट (हिं.स.) : राजस्थानचे राज्यपाल तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या वाढ
अ


भाजपा प्रदेश महामंत्री सुनील राणे यांच्या हस्ते उद्घाटन

फुलंब्री मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर, १४ ऑगस्ट (हिं.स.) : राजस्थानचे राज्यपाल तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त टोनगाव येथे आयोजित मोफत रोगनिदान सप्ताहाचा शुभारंभ भाजपा प्रदेश महामंत्री सुनील राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.

मोफत रोगनिदान सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार सुहासभाऊ शिरसाठ, नितीनजी काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामूकाका शेळके, सभापती रामबाबा शेळके, भाजपा मंडळ अध्यक्ष सुदाम ठोंबरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री मतदारसंघात विविध सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबविण्याची तयारी करण्यात आली असून, या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande