
परभणी, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परभणीत शनिवारी, दि. १५ ऑगस्ट रोजी भव्य ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, परभणी यांच्या वतीने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या पदयात्रेला सकाळी ९ वाजता विद्यनगर येथील श्री माऊली मंदिरापासून प्रारंभ होणार आहे. पदयात्रेच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्याचा तसेच स्वराज्याच्या इतिहास व परंपरेप्रती जनजागृती करण्याचा च्या उद्देशाने
या ऐतिहासिक संकल्पाच्या पदयात्रेत शिव शंभू पाईक, हिंदू बांधव, माता-भगिनी तसेच परभणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पदयात्रेच्या निमित्ताने शहरात भगवे ध्वज व स्वराज्याच्या विचारांचे वातावरण निर्माण होणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis