आविष्कारचे ही यजमान महाविद्यालय जाहीर -चार जिल्ह्यात २९ सप्टेंबर, १ ऑक्टोबर रोजी आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावीने जिल्हानिहाय आविष्कार स्पर्धेचे आयोजन २९ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. यासाठी चारही जिल्ह्यांचे यजमान महाविद्यालये निश्चित करण्यात आले अशी माहि
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावीने जिल्हानिहाय आविष्कार स्पर्धेचे आयोजन २९ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. यासाठी चारही जिल्ह्यांचे यजमान महाविद्यालये निश्चित करण्यात आले अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांनी दिली.

विद्यार्थी, संशोधक यांच्या या महोत्सवसंदर्भात यजमान महाविद्यालयाची निवड करण्यासाठी बैठक कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. व्यवस्थापन परिषद कक्षात झालेल्या या बैठकीस प्र-कलगुरू प्रा. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, समन्यवक डॉ. प्रवीण यन्नावर, सदस्य सचिव डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ’राजभवन’च्या वतीने ’आविष्कार’चे आयोजन करण्यात येते. नाविण्यपूर्ण संशोधन व नवोन्मेष या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व जास्तीत जास्त संशोधक सहभागी व्हावेत या हेतूने जिल्हयास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पदवी स्तरापर्यंतच्या स्पर्धा या जिल्हास्तरावर होणार असून पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर पदवी स्पर्धा या केवळ केंद्रीय स्तरावर विद्यापीठात होणार आहेत. विद्यापीठाशी संलग्नित ४८४ महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे, असे डॉ.अंभुरे यांनी कळविले आहे.

जिल्हानिहाय यजमान महाविद्यालय व स्पर्धेची तारिख पुढीलप्रमाणे -

१. छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्र इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, २९ सप्टेंबर

२. जालना - दानवुँâवर महिला महाविद्यालय, जालना, २९ सप्टेंबर

३. बीड - आर.पी.अट्टल महाविद्यालय, गेवराई, जि.बीड, .०१ ऑक्टोबर

४. धाराशिव - श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा, जि.धाराशिव, ०१ ऑक्टोबर

अविष्कारचे तीन स्तर, सहा गट

स्तर १: पदवीपूर्व विद्यार्थी (Undergraduate Students - UG)

स्तर २: पदव्यूत्तर विद्यार्थी (Postgraduate Students - PG)

स्तर ३: पदव्यूत्तर पदवीनंतरचे विद्यार्थी (Post PG Students - PPG)

४. प्रत्येक श्रेणी अंतर्गत समाविष्ट असलेली क्षेत्रे (Areas Covered under each Category)

• श्रेणी १: मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला: यात कला, भाषा, साहित्य, सामाजिक शास्त्रे, ललित कला, पत्रकारिता, जनसंपर्क (mass media), शिक्षण, शारीरिक शिक्षण, प्रयोग कला (performing arts), ग्रंथालय शास्त्र, मानव्यविद्या आणि कृषी विस्तार, प्रतिबंधात्मक औषध आणि पशुवैद्यकीय शास्त्र यांसारख्या सामाजिक हिताच्या इतर संबंधित क्षेत्रांचा समावेश होतो. तथापि, समाजाच्या फायद्यासाठी केलेले तांत्रिक शोध (technical innovations) या श्रेणीचा भाग असू शकत नाहीत.

• श्रेणी २: वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा: यात वाणिज्य, लेखाकर्म (accountancy), व्यवस्थापन, वित्त (finance), बँकिंग आणि विमा, कायदा आणि या शाखा लागू असलेल्या इतर क्षेत्रांचा समावेश होतो.

• श्रेणी ३: शुद्ध विज्ञान: यात सर्व मूलभूत विज्ञान, मृदा विज्ञान, गृह विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान (biotechnology), सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रम (microbiology), पर्यावरण विज्ञान, जीवन विज्ञान, जीवरसायनशास्त्र (biochemistry), जैवभौतिकशास्त्र (biophysics), जैवमाहितीशास्त्र (bioinformatics), बायोअॅनालिटिकल इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

• श्रेणी ४: कृषी आणि पशुसंवर्धन: यात फलोत्पादन (horticulture), कृषी, कृषीशास्त्र (agronomy), कीटकशास्त्र (entomology), मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि कृषी व पशुसंवर्धनाचे पैलू समाविष्ट असलेले जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवभौतिकशास्त्र, जीवरसायनशास्त्र इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

• श्रेणी ५: अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: यात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या सर्व शाखांचा समावेश होतो. यात संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, डेटा सायन्स, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान, जैवभौतिकशास्त्र, बायोमेडिकल आणि बायोसेन्सर इत्यादींचा देखील समावेश आहे जिथे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे पैलू समाविष्ट आहेत.

• श्रेणी ६: वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र (Medicine and Pharmacy): यात वैद्यकशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्राच्या सर्व शाखांचा समावेश होतो. यात पशुवैद्यकीय औषध, प्रतिबंधात्मक औषध, रोगनिदानशास्त्र (epidemiology), क्लिनिकल अभ्यास इत्यादींचा देखील समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande