ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.)। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आगामी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीला येणार आहेत. ही माहिती इराणी सूत्रांनी शुक्रवारी दिली. सप्टेंबरमध्ये राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषद
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर


नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.)। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन आगामी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीला येणार आहेत. ही माहिती इराणी सूत्रांनी शुक्रवारी दिली.

सप्टेंबरमध्ये राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पेझेश्कियन भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत २०२६ मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत असून, १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपदही भारताकडे आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली ही परिषद ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ या विषयावर आयोजित केली जाणार आहे. भारताने २०२६च्या सुरुवातीला ब्राझीलकडून ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले होते.ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा पश्चिम आशियात तणाव कायम आहे आणि इराणच्या प्रादेशिक भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पेझेश्कियन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय तसेच प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा झाली होती. इराण २०२४ मध्ये इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबत ब्रिक्सचा पूर्ण सदस्य बनला होता. त्यानंतर २०२५ मध्ये इंडोनेशियाचाही या गटात समावेश झाला आणि ब्रिक्सच्या पूर्ण सदस्यांची संख्या ११ झाली.

यापूर्वी जूनमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. बैठकीनंतर नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अराघची यांनी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित केला होता. पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी भारत अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी म्हटले होते.

अराघची यांनी हेही स्पष्ट केले होते की, तेहरानला सशस्त्र संघर्षाला कोणतेही भवितव्य दिसत नाही. सध्याच्या संकटावर लष्करी तोडगा शक्य नसून, ‘संवादातून तोडगा’ हाच पुढे जाण्याचा एकमेव व्यावहारिक मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले होते. भारतीय मध्यस्थीबाबत इराणची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी म्हटले होते, भारताच्या कोणत्याही रचनात्मक भूमिकेचे आम्ही स्वागत करू.

अराघची यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबतही चर्चा केली होती. मित्रदेश व्यावसायिक आणि व्यापारी सुरक्षेसाठी इराणवर विश्वास ठेवू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. होर्मुझमध्ये सुरक्षेचा रक्षक म्हणून इराण आपली ऐतिहासिक जबाबदारी कायम पार पाडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande