श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत 17 ऑगस्टला कावड यात्रा
रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । श्रावण मासानिमित्त येत्या सोमवारी २७ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत सकल हिंदू समाजातर्फे कावड यात्रा आयोजित करण्यात आली आहे.याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पवित्र नद्यांचे जल संकलित करून कावडीमध्ये भरून काशिविश्वे
श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत 17 ऑगस्टला कावड यात्रा


रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । श्रावण मासानिमित्त येत्या सोमवारी २७ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत सकल हिंदू समाजातर्फे कावड यात्रा आयोजित करण्यात आली आहे.याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पवित्र नद्यांचे जल संकलित करून कावडीमध्ये भरून काशिविश्वेश्वर महादेवाच्या चरणी अर्पण करून यात्रेची सांगता होईल.

ही यात्रा सकाळी 7 वाजता श्री अंबे माता मंदिर (मरुधर समाज भवन) येथून निघून कुवारबाव - साळवी स्टॉप - आरोग्य मंदिर -मारुती मंदिर -माळ नाका - जय स्तंभ मार्गे राजिवडा येथे श्री काशिविश्वेश्वर मंदिरात पोहोचेल. तेथे यात्रेची सांगता होईल.यात्रेत रत्नागिरी नगर व परिसरातील सर्व हिंदू बांधवभगिनींनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. कोणाहीकडे विविध पवित्र नद्यांचे जल असेल, त्याने आणून द्यावे किंवा संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर भारतात हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात कावड यात्रा उत्सव साजरा करतात. रत्नागिरीतील स्थानिक भाविकांसह उत्तर भारतीय हिंदू कुटुंबीयांनीही या यात्रेत सहभागी होऊन यात्रा सफल करावी, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला सकल हिंदू समाजातर्फे दीपक अर्जुनसिंह देवल, नंदू चव्हाण, दीपक जोशी, रमेश माळी, कांतिलाल मालवीय उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande