
बीड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। बीडमधील बहुचर्चित विलास घुले खून प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मयत विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी शुक्रवारी 14 ऑगस्ट रोजी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वैतागून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री बीडमध्ये दाखल होण्यापूर्वीच ही घटना घडली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis