‘आम्ही आता थकून गेलो आहोत, आम्ही हरलो आहोत’; लक्ष्मण हाकेंची खंत
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्याला विविध ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Laximan Hakke news


पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्याला विविध ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती.

यानंतर गुरुवारी पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावुक होत प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच ओबीसी नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरून आंदोलन न करता शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

“आम्ही आता थकून गेलो आहोत. आम्ही हरलो आहोत. ना ओबीसी नेते बोलतायत, ना ओबीसी मंत्री बोलतायत. आम्ही हरलो आहोत, हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना हाके यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी नेत्यांवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande