
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
जपतलाई,ता. धानोरा गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आज येथील आश्रमशाळेची पाहणी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
900 चौ.फुटांत 111 मुली, 1000 चौ.फुटांत 112 मुले राहतात. कॉट नाहीत, मच्छरदाणी नाही, हॉस्टेललगत लाकडाचा भला मोठा ढिगार पडलेला.. या ढिगारामुळेच साप होस्टेलमध्ये घुसला, ज्यामध्ये 3 निष्पाप मुलींचा जीव गेला. 111 मुलींसाठी केवळ 6 बाथरूम आणि 4 शौचालयाची सुविधा उपलब्ध होती.
सरकार आश्रमशाळांना अनुदान देते, मग विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत? असा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शाळा व्यवस्थापनासोबत आदिवासी विभाग ही जबाबदारी असून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे तसेच शाळा बंद करून उपाय करता येणार नाही तर मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शाळा सुरू ठेवणेच रास्त राहील अशी भूमिका यावेळी मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis