
रायगड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। : मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खोपोली शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते निलेश गजानन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीप भाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष तथा दैनिक बेधडक महाराष्ट्रचे संपादक अभिजीत दरेकर आणि राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
रायगड जिल्हाध्यक्ष अजय पडवळ, जिल्हा महिला अध्यक्ष अस्मिता आत्माराम साळुंखे आणि खालापूर तालुकाध्यक्ष विलास मोतीराम चाळके यांनी निलेश विचारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
खोपोली परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विचारे यांचा सक्रिय सहभाग असून नागरिकांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन शहर संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर खोपोली शहरात संघटनेची ताकद वाढविणे, युवक व महिलांचा सहभाग वाढविणे तसेच सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांना चालना देण्यावर भर देणार असल्याचे निलेश विचारे यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे खोपोलीसह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)