
लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी बंद राहणार आहे. तसेच रविवार, १६ ऑगस्ट, २०२६ रोजी नियमित वेळेप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहील.
बाह्यरुग्ण विभाग शनिवारी बंद असला, तरी रुग्णालयाची आपत्कालीन सेवा २४ तास अविरत सुरू राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis