
शेतीतील अडचणी, अपेक्षा आणि विविध प्रश्नांवर चर्चा
सरकारच्या शेतकरीहिताच्या निर्णयांची दिली माहिती
छत्रपती संभाजीनगर, १४ ऑगस्ट (हिं.स.) : टोणगाव, ता. छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी भाजपा प्रदेश महामंत्री आमदार सुनील राणे यांच्या समवेत शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीतील अडचणी, अपेक्षा आणि विविध प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, वीजबिल माफी तसेच शेतकरी हितासाठी महायुती सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताला प्राधान्य देऊन घेतल्या जात असलेल्या निर्णयांबद्दल शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांशी थेट बांधावर संवाद साधल्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेण्यास मदत झाली. शेतीशी संबंधित प्रश्नांवर प्रशासन आणि सरकारच्या माध्यमातून आवश्यक तो पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी आमदार सुहासभाऊ शिरसाठ, नितीन काळे, जिल्हा बँक उपाध्यक्ष रामु काका शेळके, सभापती राम बाबा शेळके, बाजार समिती संचालक दत्ताभाऊ उकिर्डे, खरेदी-विक्री संघ संचालक भावराव मामा मुळे, भाजपा मंडळ अध्यक्ष सुदाम ठोंबरे, भरत आहेर, दत्तू पाटील चौधरी यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis