पुणे - महापौर बंगला ‘रामदूत’ करण्यावरून वाद; माजी महापौर संघटनेचा विरोध
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। घोले रस्त्यावरील पुणे महापालिकेच्या महापौर निवासस्थानाला ‘रामदूत’ असे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांनी नाव समितीसमोर मांडला आहे. या प्रस्तावाला पुणे शहर माजी महापौर संघटनेने विरोध केला असताना महापौर मंजूषा नागपुर
पुणे - महापौर बंगला ‘रामदूत’ करण्यावरून वाद; माजी महापौर संघटनेचा विरोध


पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

घोले रस्त्यावरील पुणे महापालिकेच्या महापौर निवासस्थानाला ‘रामदूत’ असे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांनी नाव समितीसमोर मांडला आहे. या प्रस्तावाला पुणे शहर माजी महापौर संघटनेने विरोध केला असताना महापौर मंजूषा नागपुरे यांनी मात्र प्रस्तावाचे समर्थन केले आहे.महापौर बंगला गेल्या अनेक वर्षांपासून याच नावाने ओळखला जातो. त्याला स्वतंत्र नाव देण्यात आलेले नाही. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी या बंगल्याचे ‘रामदूत’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव नाव समितीसमोर ठेवला आहे. या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण झाला असून, विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला आहे.

पुणे शहर माजी महापौर संघटनेने याबाबत पत्रक प्रसिद्ध करून प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली आहे. मुंबईतही महापौरांचे निवासस्थान असून, त्याला स्वतंत्र नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुण्यातील महापौर बंगल्याचे नामकरण करू नये, तसेच भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांना प्रस्ताव मागे घेण्याची सूचना करावी, अशी मागणी संघटनेने महापौर नागपुरे यांच्याकडे केली आहे.या विरोधावर भूमिका स्पष्ट करताना नागपुरे यांनी शासकीय बंगल्यांना नावे दिली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे महापौर बंगल्याला ‘रामदूत’ हे नाव देण्यात काहीही गैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.“शासकीय बंगल्यांना नावे दिली जातात. त्यामुळे महापौर बंगल्यास ‘रामदूत’ असे नाव देण्यास हरकत नाही. या बंगल्याला रामाचे नाव दिले जात असल्याने विरोधक कोणताही संबंध जोडून टीका करत आहेत,” असे नागपुरे यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande