बडनेरा–नाशिक रोड मेमू रेल्वे १५ ऑगस्टपासून नवीन गाडी क्रमांकासह नियमित धावणार
जळगाव, 14 ऑगस्ट (हिं.स.) | जळगाव, भुसावळसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच बडनेरा–नाशिक रोडदरम्यान धावणाऱ्या मेमू विशेष रेल्वेला आता कायमस्वरूपी नियमित सेवेचा दर्जा देण्यात आला आहे. ही सेवा उद्या म
बडनेरा–नाशिक रोड मेमू रेल्वे १५ ऑगस्टपासून नवीन गाडी क्रमांकासह नियमित धावणार


जळगाव, 14 ऑगस्ट (हिं.स.) | जळगाव, भुसावळसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच बडनेरा–नाशिक रोडदरम्यान धावणाऱ्या मेमू विशेष रेल्वेला आता कायमस्वरूपी नियमित सेवेचा दर्जा देण्यात आला आहे. ही सेवा उद्या म्हणजेच १५ ऑगस्टपासून नवीन गाडी क्रमांकासह नियमित धावणार आहे.

आतापर्यंत ही गाडी ०१२११/०१२१२ या विशेष क्रमांकाने धावत होती. आता या गाडीचे नियमित सेवेत रूपांतर करण्यात आले असून, बडनेरा ते नाशिक रोडसाठी ६११३० आणि नाशिक रोड ते बडनेरासाठी ६११२९ असे नवीन गाडी क्रमांक देण्यात आले आहेत.गाडी क्रमांक ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू १५ ऑगस्टपासून दररोज सकाळी १०.०५ वाजता बडनेरा स्थानकातून सुटेल. व भुसावळ स्थानकावर दुपारी ३.०५ वाजता, जळगावला दुपारी ३.४० वाजता, पाचोरा येथे ४.१० वाजता आणि चाळीसगाव स्थानकावर सायंकाळी ४.४५ मिनिटाने पोहोचेल. यानंतर ही गाडी त्याच दिवशी संध्याकाळी ७.४० वाजता नाशिक रोडला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ६११२९ नाशिक रोड–बडनेरा मेमू दररोज रात्री ९.१५ वाजता नाशिक रोडवरून सुटेल. व चाळीसगावला रात्री ११.१० वाजता, पाचोरा येथे २३.४६ वाजता, जळगावला दुसऱ्या दिवशी रात्री १२.२२ वाजता आणि भुसावळ स्थानकावर रात्री १ वाजता पोहोचेल. यांनतर ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande