
परभणी, 14 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवार 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहप्रचारक राजेंद्र कोळपे यांचे ‘स्वबोध’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोरे काका विश्वस्त मंडळ तथा निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी यांच्या वतीने हा राष्ट्रभक्तीपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता गोरे काका भवन, परभणी येथे ध्वजारोहणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता ‘स्वबोध’ या विषयावर कोळपे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक ज्ञानेश्वर (माऊली) शिंदे राहणार आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष व्याख्यानातून राष्ट्र, समाज आणि स्वतःच्या कर्तव्याविषयी आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या राष्ट्रभक्तीपूर्ण कार्यक्रमास नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन गोरे काका विश्वस्त मंडळ तथा निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis