यवतमाळ : महावितरणच्या समाधान शिबिरात 85 टक्के तक्रारी जागेवर निकाली
यवतमाळ 14 ऑगस्ट (हिं.स.)। वीज ग्राहकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणने आयोजित केलेल्या विशेष ग्राहक समाधान शिबिराला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील चार विभागांमधील १९ उपविभागांत एकाच वेळी झालेल्या
शिबिरात 220 ग्राहकांना दिलासा:महावितरणच्या समाधान शिबिरात 85 टक्के तक्रारी जागेवर निकाली


यवतमाळ 14 ऑगस्ट (हिं.स.)। वीज ग्राहकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणने आयोजित केलेल्या विशेष ग्राहक समाधान शिबिराला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील चार विभागांमधील १९ उपविभागांत एकाच वेळी झालेल्या शिबिरात एकूण २६० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २२० तक्रारींचा म्हणजेच सुमारे ८५ टक्के तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. उर्वरित ४० तक्रारी पुढील सात दिवसांत निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी दिली.

ग्राहकांना आपल्या कार्यक्षेत्रातच वीजविषयक समस्या मांडता याव्यात आणि त्यांचे जलद निराकरण व्हावे, या उद्देशाने महावितरणने हे शिबिर आयोजित केले होते. नवीन वीज जोडणी, ग्राहकाच्या नावातील बदल, सरासरी अथवा वाढीव वीजबिल, जुन्या मीटरमधील दोष तसेच स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या. ग्राहकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी विविध केंद्रांवर उपस्थित होते.

तसेच दर अर्ध्या तासाने वीजवापराची माहिती उपलब्ध होते. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत मिळण्याची सुविधा असून, करंट लिकेजची माहितीही मिळत असल्याचे महावितरणकडून ग्राहकांना समजावून सांगण्यात आले. शिबिरात तक्रारींचे प्रत्यक्ष निवारण झाल्याने ग्राहकांना कार्यालयीन फेऱ्यांपासून दिलासा मिळाला. उर्वरित ४० तक्रारी सात दिवसांत सोडविण्याचे आश्वासन महावितरणने दिले असून, ग्राहकांच्या समस्या वेळेत निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.जुन्या मीटरच्या १२२ तक्रारी शिबिरात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी १२२ तक्रारी जुन्या मीटरशी संबंधित होत्या. यामध्ये सरासरी वीजबिल, नावात बदल आणि सदोष मीटरच्या तक्रारींचा समावेश होता. तर १०५ ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत तक्रारी व शंका उपस्थित केल्या. अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारींची पाहणी करून शक्य त्या समस्यांचे घटनास्थळीच निराकरण केले. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये असलेल्या गैरसमज आणि शंकांचेही यावेळी निरसन करण्यात आले. स्मार्ट मीटरमध्ये अचूक वीजवापराची नोंद होते.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande