मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
बीड, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि संसद रत्न ख
अ


बीड, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि संसद रत्न खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यशैलीस प्रभावित होऊन बीड मतदारसंघातील प्रणिताताई पवार, संजीवनीताई राऊत, मनीषाताई मोराळे आणि हर्षद इटकर यांनी मंत्री भरतशेठ गोगावले , शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोकजी पटवर्धन आणि बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उपनेत्या संगीताताई ठोंबरे, माझे सहकारी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीताताई चव्हाण तसेच महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉ. प्रदीपाताई थोरात यांची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande