
बीड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। बीड येथे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क व अमृत संस्थेच्या वतीने अमृत मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या श्रावण महोत्सव - २०२६ चे उदघाटन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री. अमरसिंह पंडित आणि वे.शा.सं.विनायक महाराज पाटांगणकर यांच्या शुभहस्ते आणि मण्यवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने बीड शहरात श्रावण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यावेळी डॉ.अजिंक्य पांडव, अमृत संस्थेचे कॉर्डिनेटर विशाल जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, डॉ.धनंजय रामदासी, श्री.मनोज पाठक, श्री.चंद्रकांत जोशी, श्री.मुकुंद पाचेगावकर, श्री.मिलिंद जोशी, श्री. संदीप मुळे आदींसह व्यवसायिक, समाज बांधव मोट्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis