जळगाव - शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ;  31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, 14 ऑगस्ट (हिं.स.) राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक तसेच अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शासक
जळगाव - शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ;  31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, 14 ऑगस्ट (हिं.स.) राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक तसेच अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

१२ वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या नवीन प्रवेशितांकरिता व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ७ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ असा आहे. अर्जांची छाननी दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार असून, पहिली निवड यादी दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत दिनांक १८ सप्टेंबर २०२६ आहे.सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर प्रथम रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर ‘इतर मागास बहुजन कल्याण विभाग’ हा पर्याय निवडून मुलांनी ‘मुलांचे शासकीय वसतिगृह, शिव कॉलनी जळगाव’ तसेच मुलींनी ‘मुलींचे शासकीय वसतिगृह, गिरणा पाणीची टाकी जवळ, लक्ष्मी नगर जळगाव’ हा पर्याय निवडून प्रवेश अर्ज पूर्ण भरावा.

जळगाव जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन प्रवेश अर्ज करावेत. काही अडचण असल्यास सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक विशाल पं. राठोड यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande