“मी घाबरत नाही आणि कधीही घाबरलो नाही”- सुखबीरसिंग बादल
नांदेडमधील हल्ल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया नांदेड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे निहंगाने कृपाणाने हल्ला केल्यानंतर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मी
सुखबीर सिंग बादल (फाईल फोटो)


नांदेडमधील हल्ल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

नांदेड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे निहंगाने कृपाणाने हल्ला केल्यानंतर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मी घाबरत नाही आणि कधीही घाबरलो नाही. ज्याच्या डोक्यावर गुरु साहेबांचा हात आहे, त्याला कोणतीही आंच येत नाही असे बादल यांनी स्पष्ट केले.

पंजाबमधील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यापूर्वी सुवर्ण मंदिरात आणि आता तख्त हजूर साहिबच्या भूमीत आपल्यावर हल्ला झाल्याचा उल्लेख बादल यांनी केला.शिरोमणी अकाली दल सांप्रदायिक सद्भाव आणि भाईचारा टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही बादल यांनी नमूद केले.

उजव्या हाताला दुखापत; दोन ते तीन टाके

हल्ल्यानंतर सुखबीरसिंग बादल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून जखमेवर दोन ते तीन टाके घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केली असून त्याची ओळख जसपालसिंग अशी करण्यात आली आहे. तो गुरुद्वारात सेवेदार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.घटनेनंतर नांदेडसह पंजाबमध्येही या हल्ल्याची चर्चा असून, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande