पाचव्या साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुवर्णा मुळजकर यांची निवड
परभणी, 14 ऑगस्ट (हिं.स.)। ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी गोभणी, साहित्य जगत ( मासिक ) व भगवान राईतकर सर साहित्य मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ व्या राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षप
अ


परभणी, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी गोभणी, साहित्य जगत ( मासिक ) व भगवान राईतकर सर साहित्य मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ व्या राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, लेखिका व गीतकार सुवर्णा व्यंकट मुळजकर यांची निवड करण्यात आली.

सुवर्णा व्यंकट मुळजकर ( परभणी / पुणे ) ह्या साहित्य जगत या मासिका द्वारे चालवल्या जाणाऱ्या साहित्यिक चळवळीच्या सक्रिय आणि फाउंडर मेंबर आहेत. त्यांचे गोदाकाठच्या कविता, आषाढस्य प्रथम दिवसे, सृजनाच्या वाटा, मराठी भावकविता, माहेरच्या कविता इत्यादी कार्यक्रम सुप्रसिद्ध आहेत. तसेच जीवनानुराग हा कवितासंग्रह, सुवर्णकेका हा गणपतीच्या विविध रूपांवर आधारित कवितांचा संग्रह, हृदरंग व जीवनामृत हे भावकविताचे संग्रह, असे एकूण चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत. तसेच गुंजन हा भक्तिगीतांचा व मधुमालती हा भावगीतांचा असे दोन अल्बम प्रकाशित आहेत . हे सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. त्यांनी सत्यबोधक मधील काव्यबोध या सदरात वर्षभर लेखन केले आहे. तसेच काही सामायिक कथासंग्रह, कथासरिता, मधुरघन वगैरे व काही प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

सुवर्णा मुळजकर यांचे आकाशवाणी वरून कवितांचे अनेक कार्यक्रम व गीतकार म्हणून गाणी प्रसारित झाले आहेत. मेहकर येथून चालवल्या जाणाऱ्या साहित्य जगत या मासिकाच्या त्या सहसंपादिका आहेत. दैनिक अभिव्यक्ती सामर्थ्य यामध्ये त्यांचे विविध लेख प्रकाशित होतात.

पुणे येथील 'वलयांकित प्रकाशन' आणि 'कविता तुझ्या आणि माझ्या' च्या व्यासपीठाकडून साहित्य गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनाच्या सहविचार सभेमध्ये मुळजकर यांची निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार व लेखक भगवान राईतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेला साहित्य जगत मासिकाचे कार्यकारी संपादक रामदास राजेगावकर, मुख्य संपादिका गीता भ. राईतकर, कार्यकारी संपादक कलानंद जाधव व सहसंपादक प्रा.अशोक सारडा यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande