
नांदेड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भव्य तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी, युवा मोर्चाचे डॉ. आशुतोष राजुरकर यांच्या वतीने नांदेडहून छत्रपती संभाजीनगरसाठी बस व कारचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार शेकडो युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या उत्साहात संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत.
या रॅलीच्या प्रवासाला सुरुवात करताना, भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयासमोर नांदेड भाजपा महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी बस ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी महानगर सरचिटणीस विजय येवनकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष शशिकांत शिरसागर, सरचिटणीस ओम बंडेवार, करण चव्हाण, शिवा लोट, शिवकुमार बैनवाड तथा युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भव्य तिरंगा रॅली छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक महात्मा फुले पुतळ्यापासून उत्साहात सुरू होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis