सोलापूर : भव्य तिरंगा रॅलीला अक्कलकोटकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अक्कलकोट शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला अक्कलकोटकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या
evm


सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अक्कलकोट शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला अक्कलकोटकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांच्या उत्साहामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

रॅलीत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत तिरंग्याप्रतीचा आदर आणि देशाप्रतीचा अभिमान व्यक्त केला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीमुळे अक्कलकोट शहरात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande