
बीड, 14 ऑगस्ट (हिं.स.
पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद बीड अंतर्गत आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. प्रकाश दादा सोळंके उपस्थित होते.
शेतीसोबत पशुपालन व इतर शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त व नियमित उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे, हा ‘मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता’ योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून २,४६५ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रगतिशील व अनुभवी शेतकऱ्यांनी पशुपालन, व्यवस्थापन, आर्थिक नियोजन तसेच विविध शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
शासकीय योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यावर विशेष भर देत पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाहीत आणि योजनेचा गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis