
रत्नागिरी, 15 ऑगस्ट (हिं.स.) । एआयमुळे फोटोग्राफीचे भविष्य वेगाने बदलत आहे. या बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला आणि व्यावसायिक छायाचित्रकारांना अपडेट करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशनने जागतिक छायाचित्रण दिनाच्या औचित्याने येत्या सोमवारी, दि. १७ ऑगस्ट रोजी एक दिवसीय प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली आहे.
ही कार्यशाळा सकाळी 9 ते 6 या वेळेमध्ये होणार आहे. यामध्ये एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि व्यावसायिक वापर कसा करायचा, ए आयच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ एडिटिंग कसे करावे, अॅडव्हर्टाइजमेंट, शॉर्ट फिल्म, सिनेमॅटिक रिल्स, सोशल मीडिया प्रमोशन तसेच इंस्टाग्रामवर पोस्ट, सोशल मीडिया कंटेंट, सोशल मीडिया मार्केटिंग क्रिएटिव्ह टेक्निक, ए आय मदतीने फोटो व्यवसाय अधिक आधुनिक आणि फायदेशीर कसा बनवायचा याबाबत मराठीमधून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेसाठी आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्याध्यक्ष गुरू चौगुले (९७३०४१४४४७) यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी