रत्नागिरी-पावस मार्गावर भीषण तिहेरी अपघात; २२ जण जखमी
रत्नागिरी, 15 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी-पावस मार्गावर रत्नागिरी शहराजवळ भाट्ये समुद्रकिनाऱ्याजवळ झरीविनायक मंदिराजवळच्या चढावावर शनिवारी सकाळी दोन एसटी बस आणि एका मोटारीच्या अपघातात २२ जण जखमी झाले. पावसकडून येणारी आणि पावसला जाणारी अशा दोन एसटी
दोन मोटारी एका मोटारीचा  अपघात


रत्नागिरी, 15 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी-पावस मार्गावर रत्नागिरी शहराजवळ भाट्ये समुद्रकिनाऱ्याजवळ झरीविनायक मंदिराजवळच्या चढावावर शनिवारी सकाळी दोन एसटी बस आणि एका मोटारीच्या अपघातात २२ जण जखमी झाले.

पावसकडून येणारी आणि पावसला जाणारी अशा दोन एसटी बसेस एकमेकांवर समोरासमोर धडकल्या. तेवढ्यातच पाठीमागून वेगाने येणारी मोटार एका एसटी बसवर आदळली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या या विचित्र अपघातात तिन्ही वाहनांमधील २२ प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ पूर्ण ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही दिशांकडून वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande