सन्मान खाकीचा : बीडच्या १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील पोलीस दलातील १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये ३ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, २ सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि ८ पोलीस हवालदारांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार ब
सन्मान खाकीचा


बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील पोलीस दलातील १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये ३ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, २ सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि ८ पोलीस हवालदारांचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, सादिक अकबर पठाण आणि मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम रामदास खटावकर व कैलास पंढरीनाथ अन्नलदास, तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक जगदीश कचरू करांडे व प्रल्हाद ठावर चव्हाण यांना हा सन्मान जाहीर झाला आहे.

याशिवाय पोलीस हवालदार गणेश हरिभाऊ राख, निलेश भगतसिंग ठाकूर, देविदास गिरजअप्पा जमदाडे, सुभाष नारायण मोटे, युनूस कादर बागवान, विकास विठ्ठल राठोड, अशोक अर्जुनराव दुबाले आणि गणेश विष्णू हांगे यांचाही गौरव होणार आहे.

बीड जिल्ह्यातील १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्याची दखल घेत उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी अभिनंदन केले आहे. हा सन्मान बीडच्या पोलीस दलासाठी निश्चितच अभिमानाचा क्षण ठरला आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande