जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती होती. ध्वजारोहण सो
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती होती.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थितांशी संवाद साधून जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि संघर्षातून मिळालेले स्वातंत्र्य जपणे, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे, हा प्रत्येक नागरिकाचा संकल्प असावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या वेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार नारायण कुचे, मा. अरविंद चव्हाण, मनपा महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, भास्कर आबा दानवे, राहुल लोणीकर यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande