
नांदेड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे ध्वजारोहण मंत्री अतुल सावे यांनी करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांच्या अमर बलिदानाला यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी सदैव एकजुटीने कार्य करूया.
यावेळी अनेक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीतून प्रेरणा घेत विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचा संकल्प यावेळी दृढ केला.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis