
नांदेड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचे संरक्षण करणारे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांचे आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले.
धोक्याची व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षणाचाही विलंब न करता कर्तव्य बजावत त्यांनी दाखवलेले शौर्य आणि प्रसंगावधान महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव वाढवणारे आहे. असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या धाडसी कामगिरीची देशभरातून होत असलेली प्रशंसा ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. याचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी केला
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis